October 29, 2026

एकाच रीचार्जमध्ये मिळेल OTT धमाका आणि अनलिमिटेड डेटा-कॉलिंग; 365 दिवसांसाठी जिओने आणले 3 बेस्ट प्लॅन्स!

0
Punelive24 News (36)

जर तुम्हाला दर महिन्याला रिचार्ज करण्याची कटकट टाळायची असेल, तर जिओचे काही जबरदस्त लॉन्ग टर्म प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतात. कारण त्याच्यात दररोज भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ओटीटी सबस्क्रिप्शनसारख्या सुविधा मिळतात. त्यामुळे एकाच प्लॅनमध्ये इंटरनेट, फोन कॉल आणि एंटरटेनमेंटचा फुल्ल पॅकेज मिळतो.

जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी अशा तीन लॉन्ग टर्म प्लॅनची ऑफर दिली आहे, जे 200 दिवसांपासून थेट 365 दिवसांपर्यंत वैध आहेत. या प्लॅनमध्ये दररोज 2.5 GB डेटा दिला जातो, ज्यामुळे तुम्ही सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि ऑनलाइन कामं अत्यंत आरामात करू शकता. एवढंच नाही तर, जिओ हॉटस्टार, फॅनकोड आणि जिओ टीव्हीसारख्या प्लॅटफॉर्मचा मोफत अॅक्सेस देखील दिला जातो, त्यामुळे तुमचं एंटरटेनमेंट फुल्ल ऑन राहणार.

जिओचा ₹2025 चा प्लॅन

सर्वात स्वस्त लॉन्ग टर्म प्लॅन म्हणजे जिओचा ₹2025 चा प्लॅन. या प्लॅनची वैधता तब्बल 200 दिवसांची आहे आणि रोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि मोफत एसएमएससह जिओ हॉटस्टार आणि जिओ टीव्हीचा अॅक्सेस दिला जातो. यामध्ये 50GB AI क्लाउड स्टोरेज देखील मिळते, जे आजच्या डिजिटल युगात खूप कामी येते.

₹3599 चा प्लॅन

पुढचा प्लॅन आहे ₹3599 चा, ज्यामध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये देखील दररोज 2.5 GB डेटा, अमर्यादित कॉल्स आणि रोज 100 एसएमएस मिळतात. याचबरोबर 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस दिला जातो.

₹3999 चा प्लॅन

तिसरा आणि सर्वात प्रीमियम पर्याय म्हणजे ₹3999 चा प्लॅन, ज्यात 365 दिवस वैधता आहे. यामध्ये फॅनकोड, जिओ टीव्ही आणि जिओ हॉटस्टारचा मोफत अॅक्सेस मिळतो. त्यातही दररोज 2.5GB डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह 100 मोफत एसएमएस मिळतात.

एकंदरीत, जर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्यापासून सुटका हवी असेल आणि दररोज भरपूर डेटा व ओटीटी कंटेंटसह कॉलिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर जिओचे हे तीन लॉन्ग टर्म प्लॅन तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत

 

Leave a Reply