October 31, 2026

108MP कॅमेरा, 6600mAh बॅटरी आणि लोहासारख्या मजबूत बॉडीसह येतोय नवीन Honor X9c 5G, किंमत फक्त…

0
Punelive24 News (48)

जर तुम्ही असा स्मार्टफोन शोधत असाल जो रोजच्या वापरात फक्त छान दिसावा इतकाच नाही, तर हीट , थंडी, उंचीवरून पडणं आणि धुळीपासूनही सुरक्षित असावा, तर Honor X9c 5G तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. भारतात लवकरच हा ‘बाहुबली’ फोन लाँच होणार असून, आधीच Amazon वर त्याची मायक्रोसाईट सुरू झाल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Honor X9c 5G हा फक्त नावालाच मजबूत नाही, तर त्याची रचना आणि तंत्रज्ञान देखील तेवढंच ताकदवान आहे. या फोनची बॉडी अल्ट्रा-बाउन्स अँटी-ड्रॉप टेक्नॉलॉजी 2.0 वापरून बनवण्यात आली आहे, ज्यामुळे तो तब्बल 2 मीटर उंचीवरून पडला तरी त्याला काहीही होणार नाही. अनेक फोन एकदा पडले की त्यांची स्क्रीन फुटते, पण हा फोन तुमच्यासोबत उन्हात, पावसात, थंडीत अगदी कोणत्याही हवामानात साथ देईल. तो -30°C थंडीतून ते 55°C उष्णतेपर्यंत कोणतीही अडचण न आणता सहज काम करतो. IP65M रेटिंगमुळे तो पाण्याच्या आणि धुळीच्या प्रतिकूल परिणामांपासून सुरक्षित राहतो.

कॅमेरा

या फोनचे एक विशेष आकर्षण म्हणजे त्याचा कॅमेरा सेटअप. यात 108MP चा मोशन सेन्सिंग कॅमेरा, OIS आणि EIS सारखे फीचर्स आहेत. त्यामुळे चालताना, फिरताना किंवा अंधारात सुद्धा फोटो एकदम स्पष्ट येतात. 3X लॉसलेस झूम आणि अल्ट्रा-क्लियर AI नाईट मोडसारखी फिचर्स फोटोग्राफी आणखी खास बनवतात. सेल्फीसाठी यामध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जातो.

डिस्प्लेच्या बाबतीतही Honor X9c 5G मागे नाही. यामध्ये 6.78-इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, जो 1.5K रिझोल्यूशनसह आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. 4,000 निट्सचा पीक ब्राइटनेस असल्यामुळे उन्हातही स्क्रीन स्पष्टपणे दिसते. विशेष म्हणजे, डोळ्यांवर ताण न येण्यासाठी यामध्ये विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

फोनची बॅटरी

बॅटरीबाबत बोलायचं झालं, तर Honor X9c 5G मध्ये 6,600mAh ची भलीमोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 66W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीच्या मते, हा फोन एका चार्जवर 25.8 तास ऑनलाइन व्हिडिओ प्लेबॅक आणि 48.4 तास संगीत ऐकण्याची क्षमता देतो.

किंमत

भारतामध्ये या फोनची अचूक किंमत लाँच झाल्यावरच समजेल. मात्र मलेशियात तो आधीच लाँच झाला असून तिथे 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत सुमारे ₹28,700 आहे, तर 12GB + 512GB व्हेरिएंट ₹32,500 मध्ये मिळतो. भारतातही या किंमतीच्या आसपासक फोन लाँच होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply