फोन की पॉवर बँक? तब्बल 7,550mAh बॅटरीसह भारतात लाँच झाला POCO F7 5G; पहिल्याच सेलमध्ये मिळणार तगडी सूट!
पॉकोने आपल्या नव्या स्मार्टफोनसह भारतीय टेक मार्केटमध्ये धमाका केलाय. POCO F7 5G हा फोन केवळ त्याच्या दमदार फीचर्ससाठी नव्हे, तर त्याच्या भल्यामोठ्या बॅटरीमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. आधुनिक युगात जिथे सर्वजण सतत फोनवर गुंतलेले असतात, तिथे एक असा फोन जो तुमच्या इतर डिव्हाइसेसनाही चार्ज करू शकतो, ही गोष्ट नक्कीच लक्ष वेधून घेणारी आहे.

POCO F7 5G ची बॅटरी
POCO F7 5G मध्ये 7,550mAh क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे, जी भारतातील आजपर्यंतच्या कोणत्याही स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळालेली सर्वात मोठी बॅटरी मानली जातेय. इतकी मोठी बॅटरी असल्यामुळे तुम्ही तुमचा फोन दिवसभर वापरू शकता आणि गरज भासल्यास दुसऱ्या गॅजेटला चार्जही करू शकाल. रिव्हर्स चार्जिंगसाठी यात 22.5W सपोर्ट आहे, म्हणजेच हा फोन प्रत्यक्षात पॉवर बँकच आहे, जो तुमच्या मित्रांनाही मदत करू शकतो.

याचबरोबर, POCO F7 5G मध्ये 6.83 इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 1.5K रिझोल्यूशनसह येतो. 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,200 निट्स ब्राइटनेसमुळे तुम्हाला कोणत्याही प्रकाशातही स्क्रीनचा अनुभव जबरदस्त मिळतो. गेमिंग असो की मूव्ही पाहणं, सगळं काही सुंदर आणि स्पष्ट दिसतं. यामध्ये HDR10+ सपोर्ट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन दिलं गेलं आहे.

प्रोसेसिंगच्या बाबतीतही POCO F7 5G मागे नाही. यात Snapdragon 8s Gen 4 चा प्रोसेसर असून त्याला 12GB LPDDR5X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजचा सपोर्ट आहे. हा फोन Android 15 वर आधारित HyperOS 2.0 सह येतो आणि 4 मोठे OS अपडेट्स आणि तब्बल 6 वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस देण्यात येणार आहेत, ज्यामुळे हा फोन भविष्यासाठीही तयार आहे.
AI टूल्स आणि कॅमेरा
AI टूल्स आणि स्मार्ट फिचर्समुळे हा फोन अधिकच आकर्षक वाटतो. Google Gemini, Circle to Search, AI Notes, AI Interpreter, AI Image Enhancement, AI Image Expansion यांसारखे अनेक स्मार्ट फिचर्स या फोनमध्ये आहेत. या फिचर्समुळे वापरकर्त्याचा अनुभव अधिक सुलभ आणि स्मार्ट होतो. फोनमध्ये उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 3D IceLoop सिस्टम आणि मोठा व्हेपर कूलिंग चेंबर देखील आहे.

फोटोग्राफीसाठी POCO F7 5G मध्ये 50MP चा Sony IMX882 प्रायमरी सेन्सर असून त्यासोबत 8MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला गेलाय, जो व्हिडिओ कॉलिंग आणि सोशल मीडिया साठी उत्तम कामगिरी करतो. पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP66, IP68 आणि IP69 अशी तिप्पट रेटिंग दिली गेली आहे, ज्यामुळे हा फोन खरंच मजबूत वाटतो.
1 जुलैपासून सेल, किंमत किती?

फोनचं वजन सुमारे 222 ग्रॅम आहे आणि जाडी 7.98mm. तो तीन रंगांमध्ये साइबर सिल्व्हर, फ्रॉस्ट व्हाईट आणि फँटम ब्लॅकमध्ये उपलब्ध होईल. 1 जुलैपासून दुपारी 12 वाजता या फोनची विक्री फ्लिपकार्टवर सुरू होईल. 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे आणि 12GB + 512GB व्हेरिएंट 33,999 रुपयांना उपलब्ध होईल. मात्र, पहिल्या सेलमध्ये बँक ऑफरच्या सहाय्याने तुम्ही हा फोन फक्त 29,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. त्यात 1 वर्षाची एक्स्ट्रा वॉरंटी आणि स्क्रीन रिप्लेसमेंटचाही फायदा मिळणार आहे.
