मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ मोठी मागणी; वाचा सविस्तर
Hinjewadi Infrastructure Issues
Hinjewadi Infrastructure Issues : हिंजवडीसह आसपासच्या आयटी हबच्या झपाट्याने होत असलेल्या विस्तारानंतरही या भागात आजही मूलभूत सुविधा टंचाईत आहेत. खराब रस्ते, सततची वाहतूक कोंडी, विस्कळीत वीजपुरवठा, अनेक यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव या समस्या अधिक गडद होत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून या भागासाठी स्वतंत्र प्रशासकीय संस्था स्थापन करण्याची तसेच तत्पूर्वी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची ठोस मागणी केली आहे.
हे पण वाचा : UPSC तयारी करणाऱ्या पुणेकर मुलीने झोपून कमावले ९ लाख; जाणून घ्या कशी मिळाली नोकरी?
खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, हिंजवडी, जांभे, गहुंजे, नांदे, लवळे, पिरंगुट, भुकूम या परिसरात सध्या विविध यंत्रणांचा कारभार सुरू आहे, पण त्या एकमेकांशी समन्वय न साधल्यामुळे स्थानिक नागरिक व कामानिमित्त येणाऱ्या लाखो नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पीएमआरडीए, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि स्थानिक ग्रामपंचायती — या सर्व विभागांचा कारभार स्वतंत्र असला तरी एकसंध नियोजनाचा अभाव ही या साऱ्या समस्यांची मुळ कारणं ठरत आहेत.
सुळे यांनी याआधीही अनेकदा या भागासाठी स्वतंत्र प्रशासकीय संस्थेची गरज मांडली होती. आता मात्र त्यांनी अधिक ठोसपणे पुढाकार घेत, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांना उद्देशून सांगितले आहे की, जोपर्यंत नवीन संस्था स्थापन होत नाही, तोपर्यंत एक नोडल अधिकारी नेमावा, जो विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधेल आणि नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर कारवाई करेल.
या मागणीमागे स्थानिक जनतेचा आणि आयटी कर्मचारी वर्गाचा वाढता असंतोषही मोठ्या प्रमाणात आहे. आयटी पार्क असूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खराब रस्ते, पावसात डबक्यांनी भरलेले मार्ग, वेळेवर न मिळणारी सार्वजनिक वाहतूक आणि वीजपुरवठ्याचे अपयश यामुळे ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न फसले असल्याचे चित्र आहे.
