June 15, 2026

पुण्यातील ऐतिहासिक कार्यक्रमात गोंधळ! बाजीराव पेशवे पुतळ्याच्या कार्यक्रमावर मस्तानीच्या वंशजांचा बहिष्कार; DNA चाचणीची मागणी

0
Bajirao Peshwa Statue Pune

Bajirao Peshwa Statue Pune

Bajirao Peshwa Statue Pune : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोर मराठा सेनानी बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण गुरुवारी पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते हा पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र, कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर एक वेगळाच वाद निर्माण झाला आहे. मस्तानी यांचे वंशज आणि स्वत:ला बाजीराव पेशव्यांचा खरा रक्तवंशज असल्याचं सांगणारे नवाब शदाब अली बहादूर यांनी या अनावरण सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

हे पण वाचा : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! जूनचा हप्ता आजपासून खात्यात जमा?; तुमचा हप्ता जमा नसेल झाला तर ‘हे’ काम करा

शदाब अली बहादूर यांनी स्पष्ट सांगितलं की, त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण अवघ्या दोन दिवस आधी मिळालं असून, व्यासपीठावर जागा नाकारण्यात आली आहे. “हा आमचा अपमान आहे,” असं त्यांनी ठामपणे म्हटलं. त्यांचा आरोप आहे की, पुण्यातील पेशव्यांच्या दत्तक वंशजांना प्रमुख स्थान दिलं जात आहे, तर स्वतःच्या रक्तसंबंधाचा इतिहास असलेल्यांना दुर्लक्षित केलं जात आहे.

“सध्याचे पुण्यातील पेशवे वंशज रघुनाथ राव हे भासकुटे कुटुंबाकडून दत्तक घेतले गेले आहेत. मात्र माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्यापासून जन्म घेतला होता. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांसाठी वीरमरण पत्करलं. माझ्या पणजोबांनी १८५७ मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता,” असं सांगत त्यांनी आपल्या घराण्याचा इतिहास उलगडला.

त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीवर गंभीर आरोप केले. “इतिहासाचे संदर्भ योग्य पद्धतीने मांडले जात नाहीत. अमित शहा हे इतिहासप्रेमी आहेत, त्यांनीही बाजीरावांवर पुस्तक लिहिलंय. मग त्यांनी खऱ्या वंशजांची दखल का घेतली नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हे पण वाचा : फॅमिली कार घ्यायचीये? CNG मध्ये 26 Km मायलेज, 7 जणांची जागा; फिचर्स कमाल आणि किंमतही परवडणारी

“आम्हाला या कार्यक्रमास विरोध नाही, पण आमच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान सहन करणार नाही. आम्हीच बाजीराव पेशव्यांचे खरे रक्तवंशज आहोत, यासाठी आम्ही DNA चाचणी करण्यास तयार आहोत,” असा ठाम दावा करत नवाब शदाब अली बहादूर यांनी कार्यक्रमावर बहिष्कार जाहीर केला.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading