फॅमिली कार घ्यायचीये? CNG मध्ये 26 Km मायलेज, 7 जणांची जागा; फिचर्स कमाल आणि किंमतही परवडणारी
Maruti Ertiga CNG
Maruti Ertiga CNG : इंधन दर सतत वाढत असतानाच ग्राहकांचा कल ‘स्मार्ट आणि सेन्सिबल’ पर्यायांकडे झुकतो आहे. याच प्रवाहात मारुती सुझुकीची अर्टिगा ही सीएनजी कार ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. आरामदायी सात आसनी बसण्याची व्यवस्था, जबरदस्त मायलेज आणि आधुनिक फीचर्स यामुळे अर्टिगा देशातील सर्वाधिक विकली जाणारी सीएनजी कार ठरली आहे. पुण्यासारख्या शहरात जिथे रस्त्यांवर रोजच्या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, तिथं कमी खर्चात जास्त चालणारी अर्टिगा ही खरंच ‘हिट’ ठरली आहे.
हे पण वाचा : शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी करावी? ७/१२ वर नाव किती दिवसांत येते, वाचा सविस्तर
मारुती सुझुकीने २०२५ च्या आर्थिक वर्षात तब्बल ५.९१ लाख सीएनजी गाड्या विकल्या, त्यात अर्टिगाचा वाटा १.२९ लाख युनिट्सचा आहे. म्हणजेच प्रत्येक महिन्याला सरासरी १०,८२६ युनिट्स विकल्या गेल्या. ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की अर्टिगा ग्राहकांच्या गरजांवर अगदी योग्य उतरते.
काय आहे अर्टिगाची खासियत?
मारुती अर्टिगामध्ये १.५ लिटरचं पेट्रोल इंजिन असून, ते १०३ पीएस पॉवर आणि १३७ एनएम टॉर्क निर्माण करतं. मात्र याचं सीएनजी व्हेरिएंट प्रती किलो २६.११ किमीचा अविश्वसनीय मायलेज देतं. पेट्रोलच्या वाढत्या दराच्या तुलनेत ही कार खिशाला झळ न लावता दीर्घ पल्ल्याचा प्रवास सहज शक्य करते.
अर्टिगामध्ये ७ जणांना आरामात बसता येतं. प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी ९ इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, क्रूज कंट्रोल, ऑटो एसी, पॅडल शिफ्टर्स, स्मार्टप्ले टेक्नोलॉजी, आणि कनेक्टेड कार फिचर्स देण्यात आले आहेत. वाहन चोरी किंवा ओव्हरस्पीडिंगसारख्या अलर्ट्ससह ३६० डिग्री कॅमेरा सुविधा यामध्ये आहे. त्यामुळे फक्त शहरीच नव्हे तर लांब पल्ल्याच्या ट्रिपसाठीही अर्टिगा सर्वोत्तम पर्याय ठरते.
किंमत आणि बजेटचा मेळ
अर्टिगाच्या सीएनजी बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे ११ लाख रुपयांच्या घरात असून, बजेटमध्ये चांगली फीचर्स मिळवू इच्छिणाऱ्या खरेदीदारांसाठी ही एक परिपूर्ण निवड आहे.
पुणेकरांचं खास आकर्षण
पुण्यातील अनेक कुटुंबांनी अर्टिगाची निवड केली आहे. ट्रॅफिक, पेट्रोल दर आणि मोठ्या फॅमिलीच्या गरजा लक्षात घेता, अर्टिगासारखी सीएनजी कार पर्यावरणपूरक आणि किफायतशीर ठरत आहे. यामुळेच पुण्यात आणि उपनगरांमध्ये अर्टिगाची लोकप्रियता झपाट्याने वाढते आहे.
