पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! पुण्याला पाणी देणारी चारही धरणं भरभरून भरली
Pune Dam Water Levels
Pune Dam Water Levels : पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे! पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील चारही महत्त्वाच्या धरणांमध्ये यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही, अशी शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
हे पण वाचा : शुभमन गिलच्या Nike जर्सीमुळे BCCIला आर्थिक फटका? 300 कोटींच्या करारावरून वाद
यंदा मान्सूनने वेळेआधीच महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली. मे आणि जून महिन्यांत घाटमाथा, पुणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. या पूर्वमोसमी पावसामुळे धरण परिसरात अपेक्षेपेक्षा लवकर पाणी जमा होऊ लागलं. विशेषतः पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये – खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर – मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे.
सध्या चारही धरणांमध्ये मिळून एकूण १७.९६ टीएमसी पाणीसाठा आहे. हा साठा मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्या वर्षी याच काळात फक्त ५.२७ टीएमसी म्हणजे केवळ १८ टक्के साठा झाला होता. यंदा ही टक्केवारी जुलैच्या सुरुवातीलाच पार झाल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
धरणनिहाय पाणीसाठा पाहायचा झाल्यास –
वरसगाव – ८.५० टीएमसी (६६.३४%)
पानशेत – ६.४१ टीएमसी (६०.१८%)
टेमघर – १.८६ टीएमसी (५०.०९%)
खडकवासला – १.१९ टीएमसी (६०.२६%)
या साठ्याच्या बळावर पुणे शहराला काही महिने तरी सुरळीत पाणीपुरवठा होईल, असा अंदाज आहे. याशिवाय सध्या खडकवासला धरणातून मुठा नदीकडे १६५५ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आलं आहे.
हे पण वाचा : 100 फूट खोल! महाराष्ट्रात उभं राहतंय देशाचं पहिलं बुलेट ट्रेन अंडरग्राउंड स्टेशन
दररोज सुमारे २८७ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होत असल्याने आणखी काही दिवस जोरदार पाऊस पडल्यास उर्वरित साठाही भरून निघण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाने सांगितल्याप्रमाणे, जुलैच्या पहिल्या आठवड्यातच एवढा साठा होणं ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे.
