June 19, 2026

पुणेकरांनो खुशखबर! हिंजवडी ते बालेवाडी मेट्रो ‘या’ दिवसापासून धावणार

0
Pune Metro Line 3

Pune Metro Line 3

Pune Metro Line 3 : पुणेकरांना अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः हिंजवडी, बालेवाडी, औंध आणि वेव्हरली परिसरात रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त नागरिकांसाठी पुणे मेट्रो लाईन 3 चा एक महत्वाचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) सप्टेंबर 2025 पर्यंत 13 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा टप्पा मेगापोलिस सर्कल ते बालेवाडी फाटा दरम्यान धावणार आहे.

हे पण वाचा : नवी मुंबई ते कल्याण प्रवास आता १५ मिनिटांत होणार! नवीन उन्नत रस्त्याने ट्रॅफिकचा त्रास संपणार

गेल्या अनेक महिन्यांपासून हिंजवडी आयटी पार्कजवळ आणि आसपासच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी जाणवत आहे. या परिसरात हजारो कर्मचाऱ्यांची रोजची वर्दळ असल्यामुळे मुख्य रस्ते आणि फाटे तासन्‌तास जाम होतात. नागरिकांची वाढती नाराजी, वारंवार होणाऱ्या तक्रारी आणि या समस्येवर उपाय न सुटल्याने अखेर प्रशासनाला पावले उचलावी लागली आहेत.

PMRDA आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) अंतर्गत नोव्हेंबर 2021 पासून या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. पूर्ण मेट्रो लाईन 23.3 किलोमीटर लांबीची असून एकूण 23 स्थानकांचा समावेश आहे. या प्रकल्पाचे काम मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

मात्र, यंदा सप्टेंबरपर्यंत 13 किमीचा पहिला टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. मान ते बालेवाडी फाटा दरम्यानचा हा टप्पा म्हणजे शहरातील वाहनांच्या तासन्‌तास चालणाऱ्या वाहतूक कोंडीवर एक प्रभावी तोडगा ठरणार आहे.

हे पण वाचा : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! मासिक पगार ₹45,000; पुण्यात मेगाभरती जाहीर

पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी सांगितले की, “या मेट्रो मार्गावर शुक्रवारी प्रत्यक्ष लाईनवर मेट्रोची चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी ठरली आहे. त्यामुळे हा मार्ग प्रत्यक्ष वापरासाठी सुरू करण्याची वेळ जवळ आली आहे. 13 स्थानकांचे काम जवळपास पूर्ण झाले असून केवळ अंतिम टप्प्यातील थोडी कामे बाकी आहेत.”

त्याचबरोबर, भारतात सरासरी मेट्रोचे बांधकाम प्रति किलोमीटर 8 ते 14 महिने लागते, मात्र पीएमआरडीए अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading