October 31, 2026

शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी करावी? ७/१२ वर नाव किती दिवसांत येते, वाचा सविस्तर

0
712 land Record

712 land Record

7/12 land Record : पुणे जिल्ह्यात शेतजमिनीच्या वारस हक्काच्या नोंदीसाठी अनेक अर्जदार तहसील कार्यालयांचे उंबरे झिजवत आहेत. अनेकांना सातबारा उताऱ्यावर (७/१२) नाव नोंदवण्यासाठी किती वेळ लागेल, ही चिंता सतावत आहे. यामागील प्रशासनिक प्रक्रिया समजून घेतली तर हा उशीर का होतो हे लक्षात येते.

हे पण वाचा : पुण्यातील 123 कुटुंबांनी उभारलेलं एकमेव खासगी शहर तुम्हाला माहिती आहे का? वाचा कधीच न वाचलेली माहिती

ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी यांच्या कार्यालयात फेरफार नोंदवण्यासाठी दोन प्रकारचे अर्ज येतात – नोंदणीकृत फेरफार आणि अनोंदणीकृत फेरफार. नोंदणीकृत फेरफार म्हणजे जे दस्तऐवज दुय्यम निबंधक कार्यालयात (सारस्वत कार्यालयात) नोंदवले गेले आहेत. हे फेरफार ई-फेरफार प्रणालीद्वारे थेट महसूल यंत्रणेकडे पोहोचतात. त्यांच्यावर तातडीने प्रक्रिया होते.

मात्र, वारस नोंद हा अनोंदणीकृत फेरफार प्रकारात मोडतो. यामध्ये अर्जदाराने स्वतः अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे तलाठीकडे सादर करावी लागतात. तहसीलदार शशिकांत जाधव सांगतात, “वारस नोंदीच्या अर्जावर प्रथम गाव नमुना ६-क मध्ये नोंद घेतली जाते आणि मग मंडल अधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी पाठवले जाते.”

मंडल अधिकारी संबंधित कागदपत्रांची बारकाईने तपासणी करतात. नोंद योग्य वाटल्यास ती मंजूर केली जाते, अन्यथा नामंजूरही होऊ शकते. मंजुरीनंतर फेरफार घेतला जातो. त्यानंतर सर्व संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवून १५ दिवसांत हरकत असल्यास ती नोंदवण्याची संधी दिली जाते.

हे पण वाचा : 70 तास कामाचे आवाहन करणाऱ्या मूर्तींना झटका? इन्फोसिसनं कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम थांबवायला सांगितलं!

जर कुणी हरकत घेतली नाही, तर फेरफार अंतिम मानला जातो आणि ७/१२ उताऱ्यावर नवे नाव उमटते. मात्र, ही प्रक्रिया दोन टप्प्यांत होत असल्याने वेळ लागतो – एक म्हणजे वारस नोंदवहीमध्ये नोंद, आणि दुसरे म्हणजे प्रत्यक्ष फेरफार.

अनेक वेळा नागरिकांना वाटते की अर्ज दिला की दुसऱ्या दिवशी ७/१२ अद्ययावत होईल, पण प्रत्यक्षात त्या मागे कायदेशीर प्रक्रिया, चौकशी आणि प्रशासकीय मान्यता आवश्यक असते. ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी अशा वेळ लागतो. जर कुणाला वाटत असेल की त्याचा अर्ज प्रलंबित आहे किंवा मुद्दाम उशीर केला जात आहे, तर त्यांनी संबंधित तहसीलदार यांच्याकडे तक्रार करावी.

Leave a Reply