October 29, 2026

Pune Real Estate : पुण्यातील घराच्या किमतींमध्ये मोठी वाढ, या परिसरातील घरे असणार सर्वात महाग

0
Pune Live24 (8)

Pune Real Estate : पुणे शहरातील घरांच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, नोंदणी व मुद्रांक विभागाने जाहीर केलेल्या रेडीरेकनर दरांनुसार, लॉ कॉलेज रस्ता हा परिसर सर्वाधिक महागडा ठरला आहे. यंदाच्या 2025-26 या आर्थिक वर्षात रेडीरेकनर दरात सरासरी 4.16 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात घर घेण्याची किंमत वाढली असून, प्रीमियम भागांमध्ये गुंतवणूक करणे आणखी महागडे झाले आहे.

लॉ कॉलेज रस्त्यावरील सदनिकेचा दर प्रति चौरस मीटर 1,80,950 रुपये इतका असून, ऑफिससाठीचा दर 2,08,100 रुपये आहे. हा परिसर पुण्यातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमुळे आणि मध्यवर्ती स्थानामुळे अधिक मागणी असलेला आहे. येथील पायाभूत सुविधा, दळणवळणाची सोय आणि उच्चभ्रू लोकवस्ती यामुळे या भागातील दर सतत वाढत आहेत.

हे पण वाचा : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! या दिवशी पुण्यातील पाणी पुरवठा राहणार बंद!

कोरेगाव पार्क हा परिसर घरांच्या दरांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे सदनिकेचा दर प्रति चौरस मीटर 1,79,490 रुपये असून, ऑफिससाठीचा दर 2,06,420 रुपये आहे. हा परिसर आपल्या लक्झरी अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि आयटी कंपन्यांच्या उपस्थितीमुळे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर, उच्चभ्रू रहिवाशांमुळे आणि मोठ्या प्रमाणावर परदेशी नागरिक येथे राहत असल्याने या भागातील संपत्तीची मागणी वाढत आहे.

गेल्या दोन वर्षांत रेडीरेकनर दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. मात्र, 2025-26 आर्थिक वर्षात या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून, 1 एप्रिलपासून हे नवीन दर लागू झाले आहेत. यामध्ये शहरातील विविध भागांतील जमिनींचे, सदनिकांचे, दुकाने आणि ऑफिस स्पेसचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

हे पण वाचा :  4 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना धोका ?

शहरातील व्यावसायिक मालमत्तांच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक महागडा परिसर जंगली महाराज रस्ता आहे. येथे दुकानांसाठीचा दर प्रति चौरस मीटर 4,75,940 रुपये इतका आहे. व्यावसायिक हॉटस्पॉट आणि ग्राहकांची सततची गर्दी यामुळे हा परिसर व्यवसायिकांसाठी प्रीमियम ठिकाण मानला जातो.

तर, सर्वात कमी दर असलेली जमीन नांदोशी गावात असून, येथे प्रति चौरस मीटर 2,170 रुपये इतका दर आहे. त्यानंतर किरकटवाडी येथे हा दर 2,680 रुपये प्रति चौरस मीटर आहे. हे भाग मुख्य शहराच्या तुलनेने तुलनेने कमी विकसित असल्याने येथील मालमत्तांचे दर कमी आहेत.

पुण्यातील वाढते दर पाहता, भविष्यात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. प्रीमियम भागांमधील गुंतवणूक महागडी होत चालली असली तरी, पुण्याचा विकास वेगाने होत असल्याने ही गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

हे पण वाचा :  एप्रिल महिन्यात ‘या’ तारखेला शुक्र मार्गी लागणार, 3 राशींचं वाढणार टेंशन?, करा ‘हा’ उपाय!

पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामेट्रोचा नवीन प्रकल्प, दुमजली उड्डाणपूल उभा करण्याचा निर्णय

पुणे विमानतळावर प्रवासी संख्येत विक्रमी वाढ, दररोज ३०,००० हून अधिक प्रवासी

Leave a Reply