November 2, 2026

पुण्याच्या पर्यटनाची स्मार्ट वाटचाल! एकाच ॲपवर मिळणार १३८ ठिकाणांची संपूर्ण माहिती

0
Pune Tourism App

Pune Tourism App

Pune Tourism App : पुणे जिल्ह्यातील १३८ पर्यटन स्थळांची माहिती, मार्ग, शुल्क, सुविधा आणि बुकिंगची सुविधा आता लवकरच एका मोबाइल ॲपवर उपलब्ध होणार आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्याचा निर्णय घेतला असून, पर्यटकांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळावी, यासाठी ही महत्त्वाची पावले उचलली जात आहेत.

हे पण वाचा : पुण्यात धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर! मनसेचा महापालिकेला थेट इशारा

पुणे जिल्हा निसर्गसंपन्न असून येथे गड-किल्ले, धरणे, ट्रेकिंग पॉईंट्स, ऐतिहासिक वारसास्थळे, लेण्या, टेकड्या, गवताळ मैदानं अशा असंख्य पर्यटनस्थळांचा समावेश आहे. या ठिकाणी राज्यातीलच नव्हे, तर देश-विदेशातून हजारो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. मात्र यामध्ये कित्येकांना चुकीची माहिती मिळते, काही वेळा फसवणूकही होते. याशिवाय काही ठिकाणी सुविधांचा अभाव, गर्दी नियंत्रणाचा अभाव आणि अपुऱ्या माहितीमुळे पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागतो.

अलीकडे मावळमधील कुंडमळा येथील पूल अपघातासारखी घटना घडून चार पर्यटकांचे प्राण गेले होते. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अधिक सजग झाले आहे. त्यामुळे केवळ सुविधा निर्माण करणे नव्हे, तर नियोजनबद्ध आणि सुरक्षित पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी ‘टुरिझम ॲप’ तयार करण्यात येणार आहे.

हे ॲप तयार झाल्यानंतर पर्यटकांना प्रत्येक ठिकाणाची वैशिष्ट्ये, तिथे जाण्याचा मार्ग, उपलब्ध वाहन सुविधा, प्रवेश शुल्क, वेळा, स्थानिक नियम, नोंदणीची गरज, निवास व जेवणाच्या सुविधा इत्यादींची स्पष्ट माहिती मिळणार आहे.

हे पण वाचा : मोठी बातमी! गणेशोत्सवात ‘ही’ गोष्ट केली तर पुनीत बालन पैसे देणार नाहीत; दिला गंभीर इशारा

जिल्हा प्रशासनाने पर्यटन विकास आराखड्याअंतर्गत या ॲपसह इतर अनेक सुधारणा राबवण्याची तयारी सुरू केली आहे. विशेषतः गर्दी नियंत्रणासाठी ऑनलाइन नोंदणी, मर्यादित संख्येने पर्यटकांना प्रवेश, स्थानिक गाईडची अनिवार्यता, सुरक्षा पथक, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी यांसारख्या उपाययोजना आराखड्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

 

Leave a Reply