October 29, 2026

पावसाचा खरा खेळ आता सुरू! पुण्यासह ‘या’ भागात मुसळधार तडाख्याचा इशारा; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

0
Rain Alert

Rain Alert

Rain Alert : राज्यात सध्या मान्सूनचं आगमन झालं असलं, तरी चित्र अतिशय विरोधाभासी आहे. एकीकडे कोकण, रायगड, रत्नागिरी, मुंबई, सातारा, कोल्हापूरसारख्या भागांमध्ये नदीनाले ओसंडून वाहत आहेत, तर दुसरीकडे मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत अजूनही ढगांनी तोंड फीरवलं आहे.

हे पण वाचा : पाणी कधीच खराब होत नाही, पण बाटलीवर Expiry Date का असते? जाणून घ्या सत्य!

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलैपासून महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कोकण आणि सौराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. विशेषतः घाटमाथ्यावरील पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबई व उपनगरांमध्येही आकाश ढगाळ राहून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकणात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली असून काही नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत.

दुसरीकडे, विदर्भातील नागपूरला काही वेळ पावसाचा जोर चांगलाच जाणवला, मात्र संपूर्ण विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. मे महिन्यात अवकाळी पावसानं पीक उध्वस्त केलं आणि आता मान्सूनच्या खंडामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात सुमारे तीन लाख हेक्टरवरील खरीप पिकं धोक्यात आली आहेत. विशेषतः सोयाबीन पाण्याअभावी कोमेजू लागलं आहे. पावसाची उशीरात आणखी वाढ झाल्यास दुबार पेरणीचं संकट उभं राहील.

हे पण वाचा : पुण्यातील ऐतिहासिक कार्यक्रमात गोंधळ! बाजीराव पेशवे पुतळ्याच्या कार्यक्रमावर मस्तानीच्या वंशजांचा बहिष्कार; DNA चाचणीची मागणी

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा शहरालाही मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शक्कर तलाव पूर्ण कोरडा पडल्यामुळे शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेली तलावावरील बोटिंगही बंद करण्यात आली असून स्थानिक पर्यटन उद्योगावर याचा गंभीर परिणाम झाला आहे.

Leave a Reply