October 29, 2026

6 लाख भारतीयांनी खरेदी केली ही इलेक्ट्रिक स्कूटर! फीचर्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल

0
TVS IQube Electric Scooter

TVS IQube Electric Scooter

TVS IQube Electric Scooter : जर तुम्ही पेट्रोल स्कूटरला रामराम ठोकत इलेक्ट्रिककडे वळण्याचा विचार करत असाल, तर TVS कंपनीने नुकतेच सादर केलेले iQube 3.1 kWh हे मॉडेल तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. फक्त 1.03 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत ही आधुनिक आणि स्टायलिश स्कूटर मिळत असून, शहरातल्या रोजच्या वापरासाठी खास डिझाइन करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा : दरमहा फक्त ₹4000 गुंतवा आणि मिळवा ₹2.85 लाख! सरकारची हमी असलेली पोस्ट ऑफिस ‘ही’ योजना तुम्हाला माहिती आहे का?

टीव्हीएसने याआधीच iQube मालिकेत अनेक व्हेरियंट सादर केले आहेत आणि आता नव्या 3.1 किलोवॅट मॉडेलसह एकूण सहा पर्याय ग्राहकांसमोर आहेत. या नव्या मॉडेलने कंपनीच्या इलेक्ट्रिक विभागातला आत्मविश्वास अधिकच बळकट केला आहे. विशेष म्हणजे देशभरात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी वाढत असताना, टीव्हीएसने अत्यंत वेळेवर आणि ग्राहकाभिमुख निर्णय घेतला आहे.

ही स्कूटर फुल चार्ज झाल्यावर तब्बल 123 किलोमीटरची रेंज देते, जी मध्यमवर्गीय शहरी कुटुंबासाठी पुरेशी आहे. एकीकडे रेंजची चिंता न करता दुसरीकडे वीजखर्च कमी ठेवण्यासाठी हे मॉडेल उत्तम पर्याय ठरते. यामध्ये 3.1 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी असून, चार्जिंगसाठी घरगुती सॉकेटही पुरेसा असतो.

iQube 3.1 किव्हीएच व्हेरियंटमध्ये हिल होल्ड कंट्रोल, सुधारित डिजिटल डिस्प्ले, आणि नवीन यूआय डिझाइन यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. उतारावर थांबल्यानंतर स्कूटर सहजपणे पुढे सरकू नये यासाठी हिल होल्ड फंक्शन उपयोगी ठरते. शिवाय, शहरातल्या रहदारीत योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी या स्कूटरचा प्रतिसाद चांगला आहे.

किंमत आणि उपलब्धता
1.03 लाख रुपये ही या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत असल्यामुळे बजेटमध्ये EV घ्यायचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक स्मार्ट निर्णय ठरू शकतो. त्यातही सरकारी सबसिडी लागू झाल्यास ही किंमत आणखी कमी होऊ शकते, हे विशेष. या व्हेरियंटमध्ये जुनी रचना कायम ठेवत ड्युअल टोन रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे. पर्ल व्हाईट, टायटॅनियम ग्रे, स्टारलाइट ब्लू विथ बेज आणि कॉपर ब्रॉन्झ विथ बेज – हे चार आकर्षक रंग पर्याय उपलब्ध आहेत, जे स्कूटरला अधिक प्रीमियम लूक देतात.

हे पण वाचा : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घसरण; मुंबई, पुण्यात दर किती? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

ग्राहकांचा विश्वास आणि विक्रीची ताकद
टीव्हीएसने आतापर्यंत iQube मालिकेच्या 6 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली असून, 1900 हून अधिक डीलरशिप्सद्वारे सेवा दिली जाते. घरात एकच स्कूटर हवी असलेले अनेक कुटुंब याच मॉडेलवर विश्वास ठेवतात, हीच या ब्रँडची खरी ताकद आहे.

Leave a Reply