October 29, 2026

सर्वात मोठी बातमी! TikTok पुन्हा चालणार भारतात? नवीन M2 अ‍ॅपवर चर्चांना उधाण

0
TikTok India Comeback

TikTok India Comeback

TikTok India Comeback : एकेकाळी भारतात प्रचंड लोकप्रिय ठरलेलं TikTok अ‍ॅप पुन्हा चर्चेत आहे. चीनच्या ByteDance कंपनीने “TikTok M2” नावाचं नवीन अ‍ॅप तयार केलं असून, हे अ‍ॅप येत्या ५ सप्टेंबरला अमेरिकेत लॉन्च होणार आहे. विशेष म्हणजे, हे अ‍ॅप अमेरिकेसाठी खास डिझाइन करण्यात आलं असून, यामधील डेटा कंट्रोल एका अमेरिकन कंपनीकडे राहणार आहे. यामुळे अमेरिकेत TikTok वरून उठलेला बंदीचा धोका टळण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेत बनमस्का खाताय? तर मग आधी ही बातमी वाचा, माहिती वाचुन तुम्हीही व्हाल थक्क

TikTok M2 हे मूळ अ‍ॅपचंच नविन रूप असून, ByteDance ने अमेरिकी सरकारच्या दबावाखाली ही नवीन वाट शोधली आहे. अमेरिकेच्या सरकारने TikTok ला १७ सप्टेंबरपर्यंत स्थानिक अमेरिकी भागीदारांना हस्तांतरित होण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर हे स्वतंत्र अ‍ॅप आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून TikTok पुन्हा एकदा अमेरिकन वापरकर्त्यांमध्ये आपली जागा निर्माण करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, Apple च्या अटींमुळे हे अ‍ॅप पूर्णतः नवीन स्वरूपात सादर करावं लागत आहे, कारण region-specific आवृत्त्यांना App Store मध्ये मर्यादा आहेत.

या सगळ्याचा भारताशी काय संबंध?

भारतात TikTok वर २०२० मध्ये सरकारने बंदी घातल्यानंतर लाखो युजर्स आणि कंटेंट क्रिएटर्सना मोठा धक्का बसला होता. तेव्हापासून TikTok पुन्हा भारतात येणार का, यावर सतत चर्चा सुरू असते. आता अमेरिकेसाठी तयार होणारं हे M2 मॉडेल जर यशस्वी ठरलं, तर TikTok भारतासाठीही अशीच स्ट्रॅटेजी वापरण्याची शक्यता निर्माण होते आहे.

हे पण वाचा : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक निर्णय! यंदा ढोल-ताशावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही, पण….

भारतात TikTok चे कोट्यवधी वापरकर्ते होते. तरुणाईमध्ये आजही त्या जुन्या व्हिडिओंची nostalgiac चर्चा होते. जर ByteDance ने भारतीय सरकारच्या अटी स्वीकारत स्वतंत्र व्यवस्थापनाची संकल्पना मांडली, तर TikTok पुन्हा भारतात येऊ शकतो, असं तज्ज्ञांचे म्हणणं आहे.

मात्र, TikTok चं भारतात पुनरागमन राजकीय, सुरक्षाविषयक आणि जनभावनेशी जोडलेलं असल्यामुळे निर्णय त्वरित होण्याची शक्यता कमी आहे. तरीही अमेरिकेत होणाऱ्या M2 अ‍ॅपच्या यशावर भारतातल्या भवितव्याची दिशा ठरू शकते.

Leave a Reply