Hyundai च्या आगामी कार्समध्ये येणार नवे ‘Pleos’ सॉफ्टवेअर, कनेक्टिव्हिटीचा अनुभव होणार आणखी स्मार्ट
Hyundais Pleos Software : आपल्या प्रीमियम फीचर्स आणि आरामदायी केबिनसाठी Hyundai ओळखली जाते. भारतीय बाजारपेठेत Hyundai Creta, Alcazar आणि इतर मॉडेल्स उत्तम दर्जाच्या इन्फोटेनमेंट स्क्रीनसह येतात, मात्र आता कंपनी आपल्या कार्समध्ये आणखी सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. Hyundai ने आपल्या इन्फोटेनमेंट आणि कनेक्टिव्हिटी अनुभवाला पुढच्या पातळीवर नेण्यासाठी ‘Pleos’ नावाच्या नवीन मोबिलिटी सॉफ्टवेअरची घोषणा केली आहे. हे सॉफ्टवेअर नेमकं काय आहे आणि ते वापरकर्त्यांसाठी कोणते नवीन फीचर्स घेऊन येणार आहे, यावर एक नजर टाकूया.
Hyundai ‘Pleos’ सॉफ्टवेअर – काय आहे खास?
Hyundai ने नुकतेच Pleos 25 डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ‘Pleos’ नावाच्या सॉफ्टवेअरचे अनावरण केले. कंपनीने या सॉफ्टवेअरच्या मदतीने एक प्रमुख मोबिलिटी टेक कंपनी बनण्याचा निर्धार केला आहे. ‘Pleos’ हे Android Automotive OS वर आधारित असेल आणि ते वैयक्तिक पसंतीनुसार कस्टमाइज करता येणार आहे.
हे नवीन सॉफ्टवेअर 15.6-इंच स्क्रीनसह येणार असून, यामध्ये स्प्लिट-व्ह्यू, मल्टी-विंडो फंक्शन्स आणि इंटिग्रेटेड मोबाईल अॅप्स सारखी अत्याधुनिक फीचर्स असतील. विशेष म्हणजे Pleos ID नावाची सुविधा वापरकर्त्यांना त्यांच्या वैयक्तिक प्रोफाइलनुसार गाडीच्या इंटरफेसमध्ये बदल करता येईल. हे सॉफ्टवेअर 2026 च्या दुसऱ्या तिमाहीपासून Hyundai च्या कार्समध्ये समाविष्ट होईल. कंपनीचे लक्ष्य 2030 पर्यंत 2 कोटीहून अधिक वाहनांमध्ये हे सॉफ्टवेअर इंटिग्रेट करण्याचे आहे.
Pleos सॉफ्टवेअरचे फायदे
Pleos सॉफ्टवेअरमुळे Hyundai च्या कार्समध्ये युझर इंटरफेस सतत सुधारला जाईल. नवीन फीचर्स Over-The-Air (OTA) अपडेट्सच्या माध्यमातून दिले जातील. इलेक्ट्रिक वाहनांसाठी या अपडेट्सद्वारे परफॉर्मन्स आणि रेंज सुधारता येईल, तसेच ADAS आणि ऑटोनॉमस ड्रायव्हिंग सारख्या सेफ्टी फीचर्समध्येही सुधारणा केली जाईल.
नवीन सॉफ्टवेअरमुळे कारच्या नेव्हिगेशन सिस्टम आणि ड्रायव्हिंग अनुभवामध्ये मोठा बदल दिसेल. तसेच, नवीन सेफ्टी फीचर्स अपडेट करता येणार असल्याने हे सॉफ्टवेअर Hyundai च्या आगामी मॉडेल्ससाठी गेम-चेंजर ठरेल.
Hyundai Pleos Playground – थर्ड-पार्टी अॅप्ससाठी एक नवीन प्लॅटफॉर्म
Pleos सॉफ्टवेअरच्या सुरळीत कार्यप्रणालीसाठी विविध अॅप्सची गरज भासेल. यासाठी Hyundai ने Pleos Playground नावाचा एक नवीन अॅप डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म सादर केला आहे. यामध्ये तृतीय-पक्ष अॅप डेव्हलपर्ससाठी Android Automotive OS SDK, API, डिझाईन गाइड्स आणि सपोर्ट टूल्स उपलब्ध करून दिले जातील.
गूगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरप्रमाणेच, Pleos App Market वर डेव्हलपर्स त्यांचे अॅप्स अपलोड करू शकतील आणि वापरकर्ते ते Pleos Connect इन्फोटेनमेंट सिस्टमवर डाउनलोड व इन्स्टॉल करू शकतील. यामुळे कस्टमायजेबल मोबिलिटी एक्सपिरियन्स तयार करण्यास मदत होईल.
Hyundai च्या या नवीन सॉफ्टवेअरमुळे भविष्यातील कार्स अधिक स्मार्ट, कनेक्टेड आणि टेक-फ्रेंडली होतील. ग्राहकांसाठी याचा फायदा म्हणजे एक अत्याधुनिक आणि पर्सनलाइज्ड ड्रायव्हिंग अनुभव, जो सतत अपडेट होत राहणार आहे.
