मधुमेह, पचन ते केस गळती…,सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने मिळतात जबरदस्त फायदे!
प्रत्येक स्वयंपाकघरात सहज सापडणाऱ्या कढीपत्त्याचे उपयोग केवळ चवदार जेवणापुरते मर्यादित नाहीत.तर, नियमितपणे रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने अनेक गंभीर आरोग्य समस्या दूर होतात.
भारतीय स्वयंपाकात कढीपत्ता हा एक महत्वाचा घटक मानला जातो, विशेषतः दक्षिण भारतात तर याशिवाय फोडणी अपुरीच वाटते. मात्र कढीपत्ता हा फक्त सुगंध आणि चव वाढवणारा पदार्थ नसून तो एक प्रभावी औषधही आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कढीपत्ता पाने चावून खाल्ल्याने अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.
कढीपत्ता म्हणजे एक नैसर्गिक पोषणसाठाच आहे. यायामध्ये व्हिटॅमिन A, B, C, आणि E यासारखी महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात. शिवाय, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. यामुळे कढीपत्ता शरीरासाठी संपूर्ण आरोग्यवर्धक घटक ठरतो.
कोलेस्ट्रॉल कमी करतो
कढीपत्ता शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतो. त्यातील अँटीऑक्सिडंट्स हे हृदयासाठी हितकारक असून हृदयविकाराचा धोका कमी करतात.
पोटाची चरबी
दररोज रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्याने मेटॅबॉलिज्म वाढते आणि पचन क्रिया सुधारते. त्यामुळे पोटाची चरबी कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते.
रोगप्रतिकारशक्ती
कढीपत्त्यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या सामान्य आजारांपासून संरक्षण करते.
मधुमेह
मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी कढीपत्ता अतिशय फायदेशीर आहे. ते रक्तातील ग्लुकोजची पातळी संतुलित ठेवते आणि इन्सुलिनच्या कार्यक्षमतेला मदत करते.
केसांची वाढ
कढीपत्ता केसांच्या मुळांना पोषण देतो. त्यामुळे केस गळती थांबते आणि नवीन केसांची वाढ वाढते. तो केसांना चमकदार आणि मजबूत बनवतो. त्यामुळे दररोज सकाळी रिकाम्या पोटी 8 ते 10 ताजी कढीपत्त्याची पाने स्वच्छ करून चावून खायलाच हवी. यानंतर कोमट पाणी पिल्यास आणखी फायदे मिळतात.
