October 29, 2026

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर! एसटी विभागाने घेतला सर्वात मोठा निर्णय

0
Ganeshotsav Special Buses

Ganeshotsav Special Buses

Ganeshotsav Special Buses : मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातील कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या बाप्पाच्या भेटीसाठी कोकणात जाणाऱ्या हजारो चाकरमान्यांना दिलासा देणारी घोषणा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) केली आहे. यंदा २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत एसटीकडून तब्बल ५००० जादा बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

हे पण वाचा : बाबा वेंगाचे जगाला हादरवणारे भाकीत! असा विषाणू येणार की….

परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती देताना सांगितले की, “गणेशोत्सव कोकणवासीयांच्या हृदयाशी निगडीत आहे. त्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीने मोठा निर्णय घेतला असून, यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत ७०० अधिक बसेस मार्गावर धावणार आहेत.”

या विशेष बससेवा मुंबई, ठाणे, पालघर आदी प्रमुख ठिकाणांहून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसारख्या जिल्ह्यांकडे मार्गस्थ होतील. गणरायाच्या दर्शनासाठी लाखो चाकरमानी आपल्या मूळगावी परततात आणि या गर्दीचा ताण लक्षात घेता एसटीने योग्य नियोजन करून हे जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

यंदा २२ जुलैपासून आरक्षणास सुरुवात होणार आहे. प्रवाशांना एसटीचे अधिकृत संकेतस्थळ npublic.msrtcors.com, MSRTC बस आरक्षण अ‍ॅप आणि जवळच्या एसटी स्थानकावरून तिकिट आरक्षित करता येणार आहे. यामध्ये गट आरक्षणाची सुविधाही उपलब्ध असून, अमृत ज्येष्ठ नागरिकांना १००% सवलत आणि महिलांना व इतर ज्येष्ठ नागरिकांना ५०% सवलत दिली जाणार आहे.

हे पण वाचा : डॉली चायवालाचा मोठा निर्णय! ‘या’ पद्धतीने वाढवणार अजून मोठा भारतभर बिझनेस

गेल्याच आषाढी एकादशीच्या वेळेस एसटीने यशस्वीरित्या ५२०० अतिरिक्त गाड्या चालवून एक नवा विक्रम केला होता. त्याच धर्तीवर गणेशोत्सवासाठीही भरवशाची सेवा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

गणपतीच्या काळात प्रवाशांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या स्थानकावर वरिष्ठ अधिकारी तैनात असतील. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर वाहन दुरुस्ती पथके आणि ब्रेकडाऊन व्हॅन्स सतत कार्यरत असतील.

 

 

 

 

Leave a Reply