October 29, 2026

व्हॉट्सअॅपने दिला स्टाईलमध्ये अपडेट, तुमचा प्रोफाइल फोटो दिसणार ‘अवतार’ स्वरूपात! नवीन फीचर पाहिलंत का?

0
Punelive24 News (61)

व्हॉट्सअॅप हा केवळ मेसेजिंग अॅप न राहता, एक डिजिटल कम्युनिकेशनचं केंद्र बनला आहे. आणि आता, याच अनुभवाला अधिक स्मार्ट, मजेशीर आणि उपयोगी बनवण्यासाठी व्हॉट्सअॅपने 3 भन्नाट फीचर्स लाँच केली आहेत. या फीचर्समुळे यूजर्सना केवळ मेसेजेस पाठवणं सोपं होणार नाही, तर त्यांचा अॅप वापरण्याचा अनुभव पूर्णपणे अपग्रेड होणार आहे. चला जाणून घेऊया हे तीन नविन फीचर्स कोणते आहेत आणि ते तुमच्यासाठी किती उपयुक्त ठरू शकतात.

स्कॅनिंग फीचर

व्हॉट्सअॅपने आपल्या अॅपमध्ये एक नवे स्कॅनिंग फीचर दिले आहे ज्यामुळे तुम्ही आता थेट WhatsApp कॅमेऱ्याच्या मदतीनेच कागदपत्रं स्कॅन करू शकता. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी स्कॅनिंग अॅप डाऊनलोड करावे लागणार नाही. हे फीचर साध्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.25.19.21 मध्ये उपलब्ध आहे, पण लवकरच सर्वसामान्य यूजर्ससाठी ते रोल आउट होणार आहे.

अवतार प्रोफाइल फोटो

सध्या सर्वात जास्त चर्चा होत असलेलं फीचर म्हणजे “अवतार प्रोफाइल फोटो”. आता यूजर्स त्यांच्या प्रोफाइल पिक्चरमध्ये स्वतःच्या आवडीनुसार अवतार तयार करून लावू शकतात.

हे फीचर सध्या iOS 25.18.85 अपडेटमध्ये उपलब्ध आहे. ज्यांनी आधीपासून अवतार कॉन्फिगर केला आहे, त्यांना सहज सेटिंग्समध्ये हे ऑप्शन पाहायला मिळेल.

स्टेटस रीशेअर ऑप्शन

व्हॉट्सअॅपने आता स्टेटस रीशेअर आणि फॉरवर्ड करण्याचा पर्याय देखील दिला आहे, जो Instagram स्टोरीसारखाच आहे. या फीचरमुळे एकाच अपडेटला अनेक ठिकाणी शेअर करता येईल आणि तो कुणासोबत शेअर करायचा हे निवडण्याचा पर्यायही यूजर्सला दिला जात आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि iOS दोन्ही बीटा व्हर्जन्समध्ये आता उपलब्ध आहे.

 

Leave a Reply