October 29, 2026

विद्यार्थ्यांचा संताप उफाळला! पुणे विद्यापीठात आंदोलन, विद्यार्थ्यांनी तोडले बॅरिकेट्स

0
Pune University Protest

Pune University Protest

Pune University Protest : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सोमवारी दुपारी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांनी अचानक आक्रमक आंदोलन सुरू करत वातावरणात चांगलाच गहजब उडवून दिला. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालातील त्रुटींवरून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर ठिय्या दिला. मात्र, जेव्हा अनेक वेळा मागणी करूनही कुलगुरूंकडून प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा काही आंदोलकांनी थेट बॅरिकेट्स तोडून कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हे पण वाचा : व्हिडिओ व्हायरल झाला अन् पुण्यातील गुडलक कॅफे बंद! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

संपूर्ण घटनेची ठिणगी होती इंजिनिअरिंगच्या परीक्षेचा वादग्रस्त निकाल. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक गुणपत्रकांमध्ये तांत्रिक चुका झाल्या असून काहींना चुकीच्या विषयात नापास दाखवण्यात आले आहे. “आम्हाला जे विषय शिकवलेच गेले नाहीत, त्यात नापास कसे दाखवले?”, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. या त्रुटींमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘कॅरी ऑन’ पद्धत लागू करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षाला प्रवेश द्यावा, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

“आम्ही फक्त न्याय मागतोय. एका विषयामुळे आमचं करिअर धोक्यात येणं अन्यायकारक आहे. शिक्षणसंस्था समजून घ्यायला हवी की आम्ही रोबोट नाही, आम्हालाही चूक सुधारायची संधी हवी”, असं एका आंदोलक विद्यार्थिनीचं भावनिक वक्तव्य लक्ष वेधून घेणारं ठरलं.

यासंदर्भात विद्यार्थ्यांनी कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठ प्रशासनाने १० मिनिटांची वेळ दिल्याचं सांगण्यात आलं. पण वेळ उलटून गेल्यानंतरही जबाबदार अधिकाऱ्यांनी संवाद साधला नाही. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी संयम सोडला आणि बॅरिकेट्स फोडून कुलगुरूंच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ही धावपळ थांबवली. सुदैवाने कुठलीही शारीरिक झटापट झाली नाही.

हे पण वाचा : लग्नाआधी मुलाचा पगार नाही, CIBIL स्कोर विचारतात! आजच्या पिढीचा नवा ट्रेंड

प्रशासनाने परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन एक शिष्टमंडळ कुलगुरूंची भेट घेण्यासाठी गेले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पुन्हा परीक्षा किंवा निकाल पुनरावलोकनाबाबत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

सध्या विद्यापीठ परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. विद्यार्थ्यांचा आक्रोश थांबलेला नाही आणि प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply