देशातील सर्वात स्वस्त कारवर भलामोठा डिस्काऊंट; 34 किमी मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमतही खिशाला परवडणारी!
Maruti Alto K10
Maruti Alto K10 : चारचाकी गाडी घेण्याचं स्वप्न आजही लाखो मध्यमवर्गीय भारतीयांच्या मनात आहे. महागड्या वाहनांच्या बाजारात एक विश्वासार्ह, स्वस्त आणि मायलेज देणारी कार हवी असेल, तर मारुती सुझुकी ऑल्टो K10 या कारचा विचार करणं योग्य ठरेल. देशातील सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह कार म्हणून ओळख असलेली ही कार आता आणखी स्वस्त झाली आहे.
मारुती सुझुकीने या जुलै महिन्यात ऑल्टो K10 वर मोठा डिस्काऊंट जाहीर केला असून दिल्ली-एनसीआरसारख्या भागात ही कार सवलतीत खरेदी करता येणार आहे. स्थानिक डिलरशिपनुसार पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटवर तब्बल 62,500 रुपयांची सवलत मिळत आहे. तर ऑटोमेटिक व्हेरिएंटसाठी ही सवलत 67,500 रुपये इतकी आहे. एवढंच नव्हे, तर सीएनजी व्हेरिएंटवरही 62,500 रुपयांपर्यंतची भरीव सूट ग्राहकांना मिळू शकते. कॅश डिस्काऊंटव्यतिरिक्त एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट ऑफर्सदेखील लागू आहेत, त्यामुळे स्वप्नातील कार आता अधिक जवळ आली आहे.
किंमतीचा विचार करता, ऑल्टो K10 ची एक्स-शोरूम किंमत 4.23 लाखांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी ती 6.21 लाखांपर्यंत जाते. एलएक्सआय S-CNG व्हेरिएंटची किंमत सुमारे 5.90 लाख रुपये आहे. इतक्या कमी किंमतीत मिळणाऱ्या फिचर्सचा विचार करता ही कार खरोखरच ‘वॅल्यू फॉर मनी’ ठरते.
या कारमध्ये कंपनीने 1.0 लिटर क्षमतेचे 3 सिलेंडर इंजिन दिले असून ते 66 बीएचपी पॉवर आणि 89 एनएम टॉर्क निर्माण करते. यास 5-स्पीड मॅन्युअल वा एएमटी ट्रान्समिशनसह सुसज्ज करण्यात आले आहे. रोजच्या ऑफिसच्या प्रवासासाठी अथवा छोट्या कुटुंबासाठी ही कार एकदम योग्य पर्याय ठरतो.
मायलेजच्या बाबतीतही ही कार बाजी मारते. पेट्रोल व्हेरिएंट 24.4 ते 25 किमी प्रतिलिटर इतके मायलेज देते, तर सीएनजी व्हेरिएंट 33 किमीच्या आसपास मायलेज देतो, असे कंपनीचे म्हणणे आहे. पेट्रोल दरांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा दिलासा मानला जातो.
सुरक्षेच्या बाबतीतही ऑल्टो K10 मागे नाही. यात ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), चाईल्ड सेफ्टी लॉक, सेंट्रल लॉकिंग, पार्किंग सेन्सर्स अशा सुरक्षाविषयक महत्त्वाच्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त एसी, फ्रंट पॉवर विंडोज, एडजस्टेबल हेडलँप्स, हॅलोजन हेडलँप्स, गिअर शिफ्ट इंडिकेटर आणि सेंट्रल कन्सोल आर्मरेस्टसारखी सुखसोयीची तांत्रिक वैशिष्ट्येदेखील देण्यात आली आहेत.
