कोंबडा आहे ‘या’ दोन देशांचा राष्ट्रीय पक्षी, कधीही न वाचलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क
Sri Lanka National Bird
Sri Lanka National Bird : एखादा देश आपली संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान दर्शवण्यासाठी विशिष्ट प्राणी किंवा पक्ष्याला ‘राष्ट्रीय प्रतीक’ म्हणून निवडतो. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर असल्याचे आपण सर्वजण अभिमानाने सांगतो. पण जर कोणी तुम्हाला विचारलं की “कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे?” तर तुमचेही डोळे विस्फारले जातील. कारण ‘कोंबडा’ हा देखील काही देशांचा राष्ट्रीय पक्षी आहे!
कोंबडा… एक असं नाव जे आपल्या महाराष्ट्रात गावोगाव ऐकायला मिळतं. पहाटेच्या सवयी, कुजबुजत्या अंगणातील वातावरण किंवा बैलपोळ्याच्या मिरवणुकीत मानाचा मान मिळवणारा हा पक्षी, आपल्यासाठी केवळ एक पाळीव प्राणी असतो. मात्र हेच प्राणी काही देशांसाठी ‘राष्ट्रीय अभिमान’ाचे प्रतीक आहे.
सर्वप्रथम आपला शेजारी देश श्रीलंका. श्रीलंकेचा राष्ट्रीय पक्षी आहे – श्रीलंकन जंगली कोंबडी (Sri Lankan Junglefowl). स्थानिक भाषेत याला “वालिकुकुला” म्हणतात. याच पक्ष्याला पूर्वी सिलोन जंगली कोंबडी असेही म्हटले जात होते. ही प्रजाती फक्त श्रीलंकेच्या घनदाट जंगलांमध्ये आढळते. तिथली लोकसंस्कृती, पुरातन कलाकृतींमध्ये या पक्ष्याचा उल्लेख वारंवार दिसतो.
ही कोंबडी साधारणतः ३५ सेंटीमीटर लांब असून तिचं वजन सुमारे ५१० ते ६४५ ग्रॅम दरम्यान असतं. रंगीबेरंगी डोक्याचा तुरा, जांभळसर-तांबूस रंग आणि कणखर आवाज यामुळे ही प्रजाती लक्ष वेधून घेते. ती सर्वभक्षी असून, अन्न मिळेल ते खात असते. ती पक्ष्यांची आद्य प्रजाती मानली जाते आणि असंही मानलं जातं की आपल्या घरातल्या पाळीव कोंबड्यांचं मूळ हिच्यापाशीच आहे.
आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ‘कोंबडा’ केवळ आशियात नाही, तर युरोपातही राष्ट्रीय प्रतीक आहे. फ्रान्स या युरोपियन देशाचा राष्ट्रीय पक्षी देखील कोंबडा आहे! तो गॅलिक रुस्टर या नावाने ओळखला जातो. या कोंबड्याला फ्रेंच इतिहासात एक खास स्थान आहे. प्राचीन काळी तो ‘शौर्य’, ‘लढाऊ वृत्ती’ आणि ‘धैर्य’ यांचं प्रतीक मानला जात असे. फ्रेंच क्रांतीपासून गॅलिक कोंबडा त्यांच्या राष्ट्रीय गर्वाचा भाग बनला आहे. आजही काही ऐतिहासिक फ्रेंच इमारतींवर, नाण्यांवर आणि फुटबॉल संघाच्या लोगोमध्ये या कोंबड्याचं चित्र दिसून येतं.
