October 29, 2026

व्होल्वोची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV EX30 भारतात येणार; वाचा किंमत किती असणार?

0
Volvo EX30 India Launch

Volvo EX30 India Launch

Volvo EX30 India Launch : भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात एक नवा टप्पा गाठण्याची तयारी सुरु आहे आणि या दौडीत आता स्वीडनची प्रतिष्ठित कार निर्माता कंपनी व्होल्वो देखील आघाडीवर येत आहे. व्होल्वो लवकरच आपली सर्वात स्वस्त आणि कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक SUV — EX30 — भारतीय बाजारात सादर करणार आहे. ही SUV केवळ स्वस्तच नाही, तर अत्याधुनिक फीचर्स, दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त लक्झरी अनुभवासह येणार असल्याने अनेकांचे लक्ष या गाडीवर खिळले आहे.

हे पण वाचा : एअर इंडिया विमान अपघाताचे खरे कारण अखेर समोर; वाचा अपघाताचा शॉकिंग रिपोर्ट

EX30 ही SUV व्होल्वोच्या लोकप्रिय EX90 आणि EX40 च्या तुलनेत किमतीत अधिक परवडणारी असणार आहे. विशेष बाब म्हणजे, ही कार भारतातच असेम्बल केल्या जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिची किंमत आणखी कमी ठेवता येईल. अद्याप कंपनीकडून अधिकृत किंमत जाहीर झालेली नसली तरीही ही SUV सुमारे ५० लाखांखाली उपलब्ध होऊ शकते, असा अंदाज आहे.

डिझाईनच्या बाबतीत बोलायचं झालं, तर EX30 ही SUV आकाराने कॉम्पॅक्ट असली तरी तिच्यात EX90 सारखा रॉयल लुक दिसतो. थॉरच्या हॅमर डिझाईनची हेडलाइट्स, आकर्षक क्रॉसओव्हर प्रोफाईल आणि गाडीची एकंदर रचना ही आधुनिकतेचा आणि परंपरेचा परिपूर्ण संगम आहे.

तांत्रिक बाजूने पाहिल्यास, EX30 मध्ये 69kWh क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. सिंगल आणि ड्युअल मोटरचे दोन व्हर्जन भारतीय बाजारात येऊ शकतात. यामध्ये ड्युअल मोटर व्हर्जन तब्बल ४२७ बीएचपी पॉवर जनरेट करू शकतो. एवढंच नाही तर ० ते १०० किमी/ताशी वेग फक्त ३.४ सेकंदात गाठण्याची क्षमता या SUV मध्ये आहे. ही SUV एका चार्जमध्ये सुमारे ५०० किमी इतकी रेंज देऊ शकते, जी सध्याच्या इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एक मोठं आकर्षण ठरू शकतं.

हे पण वाचा : मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी! गटारी अमावस्याला दारू मिळणार नाही? नेमकं कारण काय

गाडीच्या इंटीरियरमध्येही प्रीमियम लुक टिकवण्यात आला आहे. १२.३ इंचांचा पोर्ट्रेट ओरिएंटेड टचस्क्रीन, गुगल-बेस्ड इन्फोटेनमेंट सिस्टीम, हरमन कार्डनचा साउंड सिस्टीम, पॅनोरॅमिक सनरूफ, पावर्ड सीट्स, ३६० डिग्री कॅमेरा आणि आधुनिक ADAS सेफ्टी फीचर्स यामुळे ही SUV ‘फुल्ली लोडेड’ असल्याचं स्पष्ट होतं.

Leave a Reply