October 29, 2026

एअर इंडिया विमान अपघाताचे खरे कारण अखेर समोर; वाचा अपघाताचा शॉकिंग रिपोर्ट

0
Air India Crash

Air India Crash

Air India Crash : 12 जून 2026 रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघातामागचं कारण अखेर प्राथमिक तपासात स्पष्ट झालं आहे. या दुर्घटनेचा जबाबदार कोण, हा प्रश्न अनेकांच्या मनात असताना, एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने सादर केलेल्या प्राथमिक अहवालाने अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. टेकऑफनंतर केवळ काही सेकंदांतच विमानाची दोन्ही इंजिनं अचानक बंद झाल्यानं हा अपघात घडल्याचं या अहवालातून निष्पन्न झालं आहे.

हे पण वाचा : मद्यप्रेमींसाठी वाईट बातमी! गटारी अमावस्याला दारू मिळणार नाही? नेमकं कारण काय

सदर घटना अहमदाबाद विमानतळावरून विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच घडली. विमान हवेत झेपावत असताना एका क्षणी त्याचा वेग 180 नॉट्सवर पोहोचला, आणि त्याचवेळी दोन्ही इंजिनमधून इंधनपुरवठा थांबल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे विमानाच्या नियंत्रणावर परिणाम झाला आणि काही सेकंदांतच ते जमिनीवर कोसळलं.

या घटनेतील सर्वात खळबळजनक भाग म्हणजे कॉकपिटमधील संभ्रम. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरच्या तपासणीतून समोर आलेल्या संवादांनुसार, एक पायलट दुसऱ्याला विचारतो, “तू इंजिन का बंद केलं?”, त्यावर दुसऱ्याचा जवाब होता, “मी काहीच केलं नाही.” या संवादावरून हे स्पष्ट होतं की, पायलटांनी हेतुपुरस्सर इंजिन बंद केली नव्हती. त्यामुळे ही मानवी चूक नसून तांत्रिक बिघाडाची शक्यता अधिक ठोस वाटू लागली आहे.

अपघातानंतर विमानाचे दोन्ही इंजिन पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. इंजिन 1 काही अंशी रिस्टार्ट झालं, पण इंजिन 2 पूर्णपणे कार्यरत होऊ शकलं नाही. विमान आपोआप ऑटोस्टार्ट मोडवर गेला, तरीसुद्धा ते हवेत स्थिर राहण्यात अपयशी ठरलं.

तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब उघडकीस आली – Ram Air Turbine (RAT) बाहेर आलेली आढळली. RAT हे उपकरण विमानात अशा आपत्कालीन स्थितीसाठी असतं जेव्हा मुख्य वीजपुरवठा खंडित होतो. यावरून हे निश्चित होतं की इंजिन बंद झाल्यामुळे संपूर्ण पॉवर सप्लायवर परिणाम झाला होता, आणि विमानात काही सेकंदांतच पूर्ण अंधार आणि नियंत्रणाचा अभाव निर्माण झाला.

हे पण वाचा : ‘या’ अ‍ॅपच्या माध्यमातून तपासा तुमचं सोन खरं आहे की खोट? वाचा संपूर्ण प्रक्रिया

AAIB चा प्राथमिक अहवाल सध्या चर्चेचा विषय ठरत असला तरी, अंतिम निष्कर्ष अद्याप जाहीर झालेला नाही. इंजिन युनिटमधील तांत्रिक दोष की सॉफ्टवेअरमधील चूक — याचा शोध अजून सुरू आहे. एअर इंडिया प्रशासनाने तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने याबाबत सर्व बाबींचा बारकाईने आढावा घेत तपास पुढे नेण्याचं आश्वासन दिलं आहे.

Leave a Reply