सर्वात मोठी बातमी! फक्त ५ लाखात घर? म्हाडाची नवी लॉटरी जाहीर; जाणून घ्या अर्ज कसा करावा?
Mhada Lottery 2025
Mhada Lottery 2025 : स्वतःच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आली आहे. वाढत्या महागाईच्या काळातही आता तुमचं ‘स्वप्नातील घर’ तुम्हाला अवघ्या 5 लाख रुपये देऊन मिळू शकतं! हो, ही कल्पना नाही, तर म्हाडाने प्रत्यक्षात आणलेली एक सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागासाठी नवीन गृहनिर्माण लॉटरी जाहीर केली असून, त्यामध्ये हजारो परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
योजनेचा लाभ विशेषतः अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना घेता येणार आहे. या लॉटरीतून मिळणारी घरे विविध भागांत आणि वेगवेगळ्या बजेटमध्ये असून काही घरे फक्त 4.85 लाख रुपयांपासून सुरू होतात, ही या योजनेतील सर्वात आकर्षक बाब आहे.
अर्ज कधी करायचा?
ही लॉटरी योजनेसाठी अर्ज प्रक्रिया 30 जून 2025 पासून सुरू झाली आहे, आणि इच्छुक लाभार्थ्यांना 11 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर – https://housing.mhada.gov.in – ऑनलाईन पद्धतीने पार पडेल.
कोठे मिळणार आहेत घरे?
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 1351 घरे तर नाशिक विभागात 1485 घरे उपलब्ध आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घरे नक्षत्रवाडी, चिखलठाणा, देवळाई, आनंद पार्क यासारख्या भागांमध्ये आहेत.
विशेष म्हणजे आनंद पार्कमध्ये फक्त 4.85 लाख रुपयांपासून घरे उपलब्ध आहेत. ही लॉटरीतली सर्वात कमी किंमतीची घरे आहेत.
नक्षत्रवाडीमध्ये सर्वाधिक म्हणजे 1056 घरे उपलब्ध असून त्यांची किंमत सुमारे 15.30 लाख आहे.
चिखलठाण्यातील दुसऱ्या प्रकल्पात काही घरे 34 लाखांपर्यंतच्या किंमतीची आहेत.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथेही 92 घरे 10.65 लाखांच्या दरात उपलब्ध आहेत.
नाशिकमध्ये घरे कुठे व कितीला?
नाशिकमध्ये वडाळा शिवारमधील ‘पार्श्वनाथ प्रोजेक्ट’ येथे 12.68 लाख ते 13.55 लाख रुपयांमध्ये घरे आहेत.
‘प्रणव गार्डन, अडगाव शिवार’ येथील घरे 11.94 लाख ते 15.31 लाखांदरम्यान उपलब्ध आहेत.
मध्यम उत्पन्न गटासाठी, अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको आणि सावेदी परिसरात फक्त 5.48 लाख रुपयांत घरे देण्यात येणार आहेत.
हे पण वाचा : रात्री गॅसवर मीठ टाकल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे; ‘हा’ जुगाड एकदा नक्की करून पाहा!
या योजनेचा फायदा कोण घेऊ शकतो?
ज्यांचे वार्षिक उत्पन्न कमी किंवा मध्यम श्रेणीत येते, त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे. घरांच्या किमती बजेटमध्ये असून लॉटरी प्रणालीमुळे संधी सर्वांना आहे. त्यामुळे तुमचं स्वतःचं हक्काचं घर मिळवण्यासाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते.
