June 13, 2026

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात वाढ होणार; केंद्र सरकार 4% महागाई भत्ता वाढवणार

0
Central Government DA Hike

Central Government DA Hike

Central Government DA Hike : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी मिळणाऱ्या महागाई भत्त्यात (DA) लवकरच 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या 55 टक्क्यांवर असलेला DA जुलै 2025 पासून 59 टक्क्यांवर जाऊ शकतो. ही वाढ सातव्या वेतन आयोगानुसार होणारी अंतिम वाढ ठरण्याची शक्यता आहे, कारण आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपत आहे.

हे पण वाचा : वाढवणला बनणार ‘चौथी मुंबई’; ९६ गावांमध्ये होणार अंतरराष्ट्रीय शहराचा विकास; वाचा नागरिकांना काय फायदा होणार?

महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराचा एक महत्त्वाचा भाग असून त्यावर त्यांची खरेदी क्षमता आणि बचतीवर थेट परिणाम होतो. यंदाची DA वाढ All India Consumer Price Index for Industrial Workers (AICPI-IW) या निर्देशांकाच्या वाढीवर आधारित आहे. मे 2025 मध्ये हा निर्देशांक 144 वर पोहोचला असून मार्चमध्ये तो 143 आणि एप्रिलमध्ये 143.5 होता. जर हा ट्रेंड पुढेही कायम राहिला, तर 12 महिन्यांची सरासरी 144.17 होऊ शकते, आणि यावरून DA मध्ये 4 टक्क्यांची वाढ शक्य असल्याचे संकेत आहेत.

AICPI-IW निर्देशांकाचा वापर महागाईची पातळी मोजण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या DA च्या प्रमाणाची गणना करण्यासाठी केला जातो. दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्र सरकार महागाई भत्त्याचा पुनर्विचार करते. या वेळी होणारी वाढ कर्मचाऱ्यांसाठी केवळ मासिक उत्पन्न वाढवणारी नसून भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅच्युटी यांसारख्या निधींमध्येही थेट वाढ होण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : 6 लाख भारतीयांनी खरेदी केली ही इलेक्ट्रिक स्कूटर! फीचर्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल

जर एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 18,000 रुपये असेल, तर सध्या त्याला 55 टक्के DA म्हणजे 9900 रुपये मिळतात. वाढीनंतर हेच DA 59 टक्क्यांवर गेल्यास 10,620 रुपये मिळतील – म्हणजेच 720 रुपयांची दरमहा वाढ. त्याचप्रमाणे, 50,000 रुपयांवर DA 27,500 रुपयांवरून थेट 29,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

या वाढीचा थेट लाभ केंद्र सरकारच्या विविध खात्यांतील कर्मचारी, पेन्शनधारक आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना होणार आहे. दरमहा खर्च वाढत असताना अशी भत्तावाढ त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे. यामुळे आर्थिक स्थैर्य टिकवण्यास मदत होणार असून सणासुदीच्या तोंडावर ही घोषणा होण्याची शक्यता असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.

Leave a Reply

Discover more from Punelive24

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading