October 29, 2026

Maharashtra Rain News : महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी संकट ! विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

0
Pune Live24 (5)

Maharashtra Rain News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा झपाट्याने वाढत आहे. चंद्रपूरसारख्या भागांत उष्णतेची तीव्रता वाढली असून, काही ठिकाणी उष्णतेची लाट जाणवत आहे.

मात्र, दुसरीकडे राज्यात काही भागांत पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात विजांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उन्हाच्या झळा वाढत असताना काही भागांत अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत. लातूर आणि सांगलीसह काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात तापमान सातत्याने वाढत असून नागरिकांनी उष्णतेपासून सावध राहण्याची गरज आहे.

हे पण वाचा : लाडक्या बहिणीमुळे घर खरेदी करण्याचं स्वप्न होणार अवघड ! जाणून घ्या काय आहे कनेक्शन ?

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस पडू शकतो. दुसरीकडे, काही भागांत उन्हाच्या झळा अधिक जाणवणार आहेत. ब्रह्मपुरी येथे तापमानाने ४२.३ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे.

गोदिंया, जेऊर, सोलापूर, अमरावती, भंडारा आणि गोंदिया येथे तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचले आहे. राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण असूनही उष्णतेची तीव्रता वाढल्याचे चित्र आहे.

मुंबईत मात्र आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून, कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. पुण्यात तापमान सरासरी पातळीवर राहील, तर खानदेशात उन्हाचा तडाखा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा : बायकोसोबत राहत नसाल तरी सुद्धा घराचा हप्ता भरावाच लागेल! न्यायालयाचा स्पष्ट आदेश

जळगावमध्ये तापमान ३८ अंशांपर्यंत पोहोचले असून, महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणीही ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यातच राज्यभरात तीव्र उन्हाचा अनुभव आला. हवामान विभागाने याआधी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता, आणि त्यानंतर अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली.

होळी सणानंतर राज्यातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे पण वाचा : सिंहगड, जेजुरी, पानशेत… पुणे दर्शन आता PMP बसने फक्त 500 मध्ये! कसं कराल बुकिंग?

पुरंदर विमानतळ प्रकल्पावरून शेतकरी आक्रमक, भूसंपादन करण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मागणी!

पुणे पुन्हा हादरलं! १५ वर्षीय मुलीवर लॉजमध्ये अत्याचार, ‘लग्न कर नाही तर जीव घेईन’ म्हणत धमकी!

Leave a Reply